spot_img
spot_img
spot_img

शबनम सय्यद यांना मराठी रत्न पुरस्कार जाहीर!

शबनम न्यूज | पिंपरी

पिंपरी चिंचवड, व पुणे शहरात मागील नऊ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या पत्रकार शबनम सय्यद यांना ‘मराठी रत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

शहरातील कस्तुरी राईज फाउंडेशन वतीने मराठी रत्न पुरस्कार सोहळा १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील ग. दि. माडगूळकर सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. या पुरस्कार सोहळ्यात शबनम सय्यद यांना मराठी रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात शबनम न्यूज या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून मागील नऊ वर्षापासून शबनम सय्यद या पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक, शैक्षणिक ,राजकीय ,क्रीडा, गुन्हे अशा अनेक क्षेत्रातील बातम्या देण्याचे काम शबनम न्यूज या वृत्त संस्थेच्या माध्यमातून होत आहे. संपादिका या पदावर शबनम सय्यद या उत्तम प्रकारे आपली जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच पत्रकारिता बरोबरच सामाजिक कार्यातही शबनम सय्यद या अग्रेसर आहेत. सामाजिक संस्था शमीम हुसेन फाउंडेशन वतीने त्या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत, त्यांच्या संपूर्ण कार्याची दखल कस्तुरी राईज फाउंडेशन वतीने घेण्यात आली व त्यांना मराठी रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार सोहळा १ मे रोजी ग. दि. माडगूळकर सभागृहात सकाळी ११ वाजता संपन्न होत असल्याची माहिती कस्तुरी राईज फाउंडेशनच्या संस्थापक विजया मानमोडे यांनी दिली आहे…..

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!