शबनम न्यूज | प्रतिनिधी
जानेवारी २०२६ मध्ये पार पडलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रभाग क्रमांक २८ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल प्रमुख व माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या पॅनेलसाठी कार्यरत कार्यकर्त्यांसाठी विशेष बक्षीस योजना राबविण्यात आली.
पिंपळे सौदागर येथील हॉटेल व्यावसायिक व नाना काटे यांचे समर्थक संतोष मल्हारी काटे उर्फ (महाराज) यांनी कार्यकर्त्यांसाठी नवीन बुलेट दुचाकी बक्षीस ठेवली होती. प्रभागातील सुमारे ३०० सक्रिय कार्यकर्त्यांमधून गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नाना काटे मित्र परिवाराच्या वतीने लकी ड्रॉ काढण्यात आला.
या लकी ड्रॉमध्ये प्रभागातील कार्यकर्ते सचिन ढेपे यांचे नाव विजेते म्हणून जाहीर झाले. त्यानंतर नाना काटे मित्र परिवाराच्या वतीने सचिन ढेपे यांचा सत्कार करून त्यांना नवीन बुलेट दुचाकीची चावी सुपूर्द करण्यात आली.
या उपक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल, असे आयोजकांनी सांगितले.



