पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडत मोठी कारवाई केली आहे.
या कारवाईत सुमारे ७ लाख ८४ हजार रुपये किमतीचे अफू जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ मार्च रोजी सकाळी सुमारे १०.२५ वाजता शिरगाव परंदवाडी पोलीस स्टेशन हद्दीत वडगाव महामार्ग कार्यालयासमोर सर्व्हिस रोडलगत संशयित हालचाली आढळल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला.
यावेळी रोशनलाल नारायणलाल जाट (वय २५, रा. राजस्थान) याच्या ताब्यातून ९८० ग्रॅम वजनाचे अफू जप्त करण्यात आले.
सदर अफूची बाजारातील किंमत अंदाजे ७ लाख ८४ हजार रुपये असून आरोपी हा हा अंमली पदार्थ बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगत असल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करत आहेत.



