spot_img
spot_img
spot_img

बावधनमध्ये मद्यधुंद चालकाचा कहर; भरधाव कारची पिकअपला धडक, एक गंभीर जखमी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब

 बेंगळुरू-मुंबई महामार्गावर बावधन परिसरात मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवणाऱ्या चालकाने पिकअप वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला.

या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ मार्च रोजी मध्यरात्री सुमारे २ वाजता पिंगारा हॉटेलजवळ हा अपघात घडला.

फिर्यादी निलेश गायकवाड हे महिंद्रा पिकअप (एमएच ४३ बीएक्स ०२५९) घेऊन जात असताना, आरोपी स्वप्नील उर्फ रोशन पिंगळे (वय २६) हा एक्सयूव्ही ७०० (एमएच २५ बीएफ ७५७६) कार मद्यप्राशन करून भरधाव वेगात चालवत होता.

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत आरोपीने पिकअपला मागून जोरदार धडक दिली.

या धडकेत पिकअप पलटी होऊन त्यातील कलिंगडाचे मोठे नुकसान झाले तसेच दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले.

या अपघातात पिकअपमधील चंद्रकांत मोरे यांना डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली असून निलेश गायकवाड व विकास किरवे हे किरकोळ जखमी झाले आहेत.

या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरी करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!