spot_img
spot_img
spot_img

दिघीत किरकोळ कारणावरून हल्ला; कुंडीने मारहाण करून व्यापारी जखमी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब

पुणे, दिघी (दि.१७ मार्च) : कुंडी (मातीची भांडी) स्वस्त दरात देण्यावरून झालेल्या वादातून व्यापाऱ्यावर मारहाण केल्याची घटना चोली फाटा परिसरात घडली आहे.

या प्रकरणी दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश वामन (वय ४५, रा. चोली बु.) हे १७ मार्च रोजी सायंकाळी त्यांच्या कुंडी विक्रीच्या दुकानात असताना आरोपी ऋषिकेश तापकीर (वय २५, रा. वडमुखवाडी) व त्याचे दोन साथीदार यांनी कमी किमतीत कुंडी देण्याच्या कारणावरून वाद घातला.

वाद वाढताच आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करत कुंडीने फिर्यादीच्या डोक्यावर मारहाण केली तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.

यावेळी “पाहून घेण्याची” धमकीही दिली.

या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

आरोपींपैकी एकाची ओळख पटली असून इतर दोघांचा शोध सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!