spot_img
spot_img
spot_img

गॅस सिलेंडरचे वितरण फक्त OTP द्वारेच होणार ; ९६ तासांत होणार घरपोच

शबनम न्यूज | प्रतिनिधी

घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण केवळ OTP प्रणालीद्वारेच करण्यात येणार असून गॅस बुकिंग केल्यानंतर ९६ तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक राहील, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील सर्व तेल कंपन्या व गॅस एजन्सींच्या प्रतिनिधींना घरगुती गॅस सिलेंडर वितरणाबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीत घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा केवळ OTP प्रणालीद्वारेच करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच गोदाम, गॅस एजन्सी किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून थेट गॅस सिलेंडरचे वितरण पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना तेल कंपन्या व वितरकांना देण्यात आल्या.

त्याअनुषंगाने सर्व गॅस एजन्सींनी त्यांच्या गोदाम किंवा कार्यालयाबाहेर “गॅस सिलेंडरचे वितरण फक्त OTP द्वारेच ९६ तासांच्या आत घरपोहोच करण्यात येईल” असा आशय दर्शविणारे फलक लावावेत, असे निर्देशही देण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींनी त्यांच्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर “गॅस सिलेंडरचे वितरण फक्त OTP द्वारेच ९६ तासांच्या आत घरपोहोच करण्यात येईल, तरी गॅस एजन्सीसमोर गर्दी करू नये” असा संदेश (SMS) पाठवावा, असेही सांगण्यात आले.
याशिवाय, ग्राहकांनी घरगुती गॅस सिलेंडरचे बुकिंग केल्यानंतर ९६ तासांच्या आत घरपोहोच वितरण करणे बंधनकारक राहील, असे निर्देश गॅस वितरकांना देण्यात आले आहेत.

नियमानुसार सुरू असलेल्या गॅस सिलेंडर वितरण प्रक्रियेत कोणीही अडथळा निर्माण केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश पोलिस प्रशासनालाही देण्यात आले आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!