spot_img
spot_img
spot_img

आण्णा लवकर बरे व्हा, चॉकलेट देत चंद्रकांत पाटील यांना दिल्या मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

“आण्णा काळजी घ्या, लवकर बरे होऊन पुन्हा जोमाने कामाला लागा!” अशा शब्दात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा दिल्या. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना २९ वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना पायाला दुखापत झाली होती. त्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली. या पार्श्वभूमीवर चंद्रकांतदादा पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी उपस्थित डॉक्टरांशीही चर्चा करून मोहोळ यांच्या प्रकृतीबाबत माहिती जाणून घेतली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!