spot_img
spot_img
spot_img

बीना इंग्लिश स्कूलच्या वतीने काश्मीरमधील मृतांना श्रदांजली

पिंपरी : बीना इंग्लिश मीडियम स्कूल, पांढारकरनगर, आकुर्डी येथे शुक्रवार, दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीना एज्युकेशनल सोसायटीचे संस्थापक – अध्यक्ष इकबाल खान होते. श्रद्धांजली अर्पण करताना मृत व्यक्तींच्या शोकाकूल परिवाराच्या दुःखात आम्हीही सहभागा आहेत, अशी भावना प्रकट करण्यात आली.
बीना एज्युकेशनल सोसायटीचे कोषाध्यक्ष हमजा खान, सरचिटणीस आजम खान, सहसचिव अकमल खान, विश्वस्त अब्दुल्लाह खान, मतलूब उस्मानी, बीना इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका समीना मोमीन, उपमुख्याध्यापिका हेरा अकमल खान, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, विद्यार्थी आणि पालक यांची उपस्थिती होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!