spot_img
spot_img
spot_img

चाकणमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; तिघांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी : युनूस खतीब, पिंपरी-चिंचवड

चाकण : चाकण परिसरातील तळेगाव चौकाजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता मौजे चाकण गाव हद्दीत तळेगाव चौकाजवळ मोरया मिसळ दुकानाच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार चाकण दक्षिण पोलिसांनी तेथे छापा टाकला.

या प्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५०/२०२६ दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी अविनाश पोपट ब्रम्हणे (वय ३७, रा. तळेगाव चौक, मोरया मिसळजवळ, ता. खेड, जि. पुणे) याला जुगार खेळवताना पकडले. तसेच जुगार खेळणारे सुरेंद्र श्रीनाथ राय (वय ५५, रा. तळेगाव चौक, ता. खेड, जि. पुणे) आणि साजन मोतीराम गोरे (वय ४५, रा. मेदनकरवाडी, खंडोबा मंदिराजवळ, चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी “चिमणी पाखरू” नावाचा सोंगट्यांचा जुगार खेळत व खेळवत असताना पोलिसांना आढळले. कारवाईत २,८५० रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सांगिडवार करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!