spot_img
spot_img
spot_img

पीसीसीओइ – सीआयआयएल यांच्या वतीने रविवारी “इनोव्हेट-एक्स” स्टार्टअप संकल्पना सादरीकरण स्पर्धा

शबनम न्यूज | प्रतिनिधी
पीसीसीओइ सेंटर फॉर इनोव्हशन इनक्युबेशन अँड लिंकेजेस फोरमच्या (पीसीसीओइ – सीआयआयएल) यांच्या वतीने “इनोव्हेट-एक्स” ही तीन दिवसीय स्टार्टअप कल्पना सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
    रविवारी १५ मार्च रोजी, सकाळी १० वाजता, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे या स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी पीसीइटीच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई व इतर प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पीसीसीओइचे संचालक, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
     या स्पर्धेत विविध शाखांतील विद्यार्थी एकत्र येऊन नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करणार असून प्रत्यक्ष मानवी जीवनातील समस्यांवर अभिनव उपाय विकसित करण्यासाठी प्रकल्प सादर करणार आहेत. या विद्यार्थ्यांना अनुभवी मार्गदर्शक व स्टार्टअप संस्थापक, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्टार्टअप संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून उद्योजकता, नवोन्मेष आणि व्यवसाय अंमलबजावणी याबाबत महत्त्वपूर्ण व्यावहारिक मार्गदर्शन देखील मिळणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. सर्व विद्यार्थ्यांनी https://ennovatex26.in/ येथे नोंदणी करावी. प्रथम नोंदणी करणाऱ्या १५० विद्यार्थ्यांना नोंदणी पूर्णतः मोफत आहे. अशी माहिती पीसीसीओइ – सीआयआयएल च्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना पाचणकर यांनी दिली आहे.  
     या स्पर्धेत नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना व संघांना एकूण दोन लाख रुपयांची बक्षीसे देण्यात येणार आहेत.
      रविवारी, सकाळी उद्घाटन व नाविन्यपूर्ण संकल्पना असणारे स्टार्टअपचे सादरीकरण, दुसऱ्या दिवशी सोमवारी निवड यादीतील स्टार्टअप आणि व्यावसायिकांचे मार्गदर्शन, समारोपाच्या दिवशी मंगळवारी गुंतवणूक व उद्योग व्यवसाय विषयी सहभागी संघांचे सादरीकरण, प्रश्नोत्तरे आणि पॅनलिस्ट मार्गदर्शन तसेच बक्षीस वितरण समारंभ होणार आहे अशीही माहिती पीसीसीओइ – सीआयआयएल च्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना पाचणकर यांनी दिली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!