शबनम न्यूज | प्रतिनिधी
शिरुर तालुक्यात अवैधपणे गोहत्या व गोमांस विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
अब्दुलहक जलील कुरेशी (वय ४६, रा. खाटीक आळी, शिरुर) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
त्याच्यावर गोवंश हत्या, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व धाकदपटशा करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्याच्या वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे शिरुर पोलिसांनी प्रस्ताव पाठविल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचा आदेश दिला.
१२ मार्च रोजी आरोपीला ताब्यात घेऊन अकोला मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलिसांनी केली.



