spot_img
spot_img
spot_img

कांदा कापताना झालेल्या वादातून भावावर चाकूने हल्ला

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब

चाकण परिसरात घरगुती वादातून मोठ्या भावाने धाकट्या भावावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास चाकण येथील शनिमंदिराच्या पाठीमागील घरात ही घटना घडली. फिर्यादी दयानंद माणिक सावंत (वय २५, रा. चाकण) हे घरात असताना त्यांचा मोठा भाऊ किशोर माणिक सावंत (वय ३०) हा घरातील सर्वांसाठी पोहे बनवण्यासाठी कांदा कापत होता.

दरम्यान, फिर्यादी कोणतेही काम करत नाही तसेच दारू पितो या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्याने आरोपीने रागाच्या भरात हातात असलेल्या कांदा कापण्याच्या चाकूने फिर्यादीच्या डाव्या बरगडीवर वार करून त्यांना जखमी केले.

या प्रकरणी दयानंद सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला बीएनएसएस कलम ३५(३) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार निघोट करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!