spot_img
spot_img
spot_img

चिंचवडमध्ये डंपरच्या धडकेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

मोबाईलवर बोलत बेदरकार वाहन चालविल्याचा आरोप; चालक अटक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब

चिंचवडमधील प्रेमलोक पार्क परिसरात डंपरच्या धडकेत सायकलस्वार १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.१२) दुपारी घडली. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फारुक शकील तांबोळी (वय १५) हा शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात होता. दुपारी सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास साई कॅफे चौक, प्रेमलोक पार्क, चिंचवड येथे तो पोहोचला असता मागून आलेल्या मिक्सर डंपर (एमएच १४ एमएच ८८६५) ने त्याला जोरदार धडक दिली.

आरोपी चालक निवृत्ती उद्धव गिरी (वय ३९, रा. आळंदी, पुणे) हा वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करत असल्याने तसेच वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे डंपर चालवत असल्याचा आरोप आहे. चौकाजवळील स्पीड ब्रेकर असूनही वाहनाचा वेग कमी न करता त्याने सायकलस्वार मुलाला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर डंपरचे चाक मुलाच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मुलाचे वडील शकील आदम तांबोळी (वय ४५, रा. चिंचवडेनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १००/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०५, २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९ आणि १७७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.

या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करंबळकर करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!