spot_img
spot_img
spot_img

सोमाटणे फाटा येथे पिस्टल विक्री करणारी टोळी जेरबंद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अवैध अग्नीशस्त्रांची विक्री करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ४ देशी बनावटीची पिस्टल, ७ जिवंत काडतुसे, ३ मोबाईल फोन आणि एक मारुती सुझुकी फ्रॉन्स कार असा एकूण १० लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आयुक्तालय हद्दीत अवैधरीत्या अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या व त्यांची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने तपास मोहीम सुरू केली होती.
दरम्यान, पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, सरदार सय्यद हा त्याच्या साथीदारांसह तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील सोमाटणे फाटा येथे पिस्टल विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने १० मार्च २०२६ रोजी सोमाटणे फाटा परिसरात सापळा रचला.
या कारवाईदरम्यान निर्जन ठिकाणी उभ्या असलेल्या मारुती सुझुकी फ्रॉन्स कारमधून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

सरदार अकबर सय्यद (वय २७), रा. यशवंतनगर, समृद्धी सोसायटी, तळेगाव दाभाडे, पुणे
विशाल नाना कुडेकर (वय ३५), रा. अनावळे, ता. खेड, जि. पुणे
प्रशांत बबुशा सोनवणे (वय २८), सध्या रा. टिळकनगर, चेंबूर, मुंबई
आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून ३ देशी बनावटीची पिस्टल व ६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ७६/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पुढील तपासादरम्यान आरोपी प्रशांत सोनवणे याच्याकडून आणखी १ देशी बनावटीचे पिस्टल व १ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. त्यामुळे या कारवाईत एकूण ४ पिस्टल आणि ७ जिवंत काडतुसे हस्तगत झाली आहेत.

तपासात असेही निष्पन्न झाले की, मुख्य आरोपी सरदार सय्यद याने ही अग्नीशस्त्रे मध्यप्रदेशातील उमरटी येथील गुरुसिंग या व्यक्तीकडून आणली होती. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून संबंधित आरोपींच्या जाळ्याचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.

दरम्यान, आरोपी सरदार अकबर सय्यद याच्याविरुद्ध चाकण पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी अपहरण व खंडणीसंबंधी गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार व सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर, पांडुरंग देवकाते, रावसाहेब मोटे, महेश खांडे तसेच पोलीस अंमलदार गणेश सावंत, विनोद वीर, हर्षद कदम, गणेश कोकणे, गणेश हिंगे, नितीन लोखंडे, प्रविण कांबळे, विशाल गायकवाड, समीर रासकर, मोहसिन आत्तार, अमोल गोरे, ज्ञानेश्वर कौलगे, अमर कदम, चंद्रकांत गडदे आणि औंदुबर रांगे यांनी सहभाग घेतला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!