spot_img
spot_img
spot_img

महाराष्ट्राच्या शिल्पकारास राष्ट्रवादीचे वंदन; योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खराळवाडी येथील मध्यवर्ती पक्ष कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना योगेश बहल म्हणाले की, यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे खरे पुरस्कर्ते होते. औद्योगिक विकासाची दिशा ठरविताना त्यांनी अविकसित विभागांचा प्राधान्याने विचार केला. ग्रामीण भागात उद्योग सुरू करून त्यांनी शेती आणि उद्योग यांची सांगड घालत शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ दिले. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या नियोजनात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्याच्या प्रगतीचा मजबूत पाया रचला गेला, असे बहल यांनी सांगितले. अशा थोर नेत्याला आपण विनम्र अभिवादन करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात महिला अध्यक्षा कविता आल्हाट आणि माजी नगरसेविका सीमा सावळे यांनीही आपल्या मनोगतातून यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष अकबर मुल्ला यांनी मानले.

या कार्यक्रमास शहराध्यक्ष योगेश बहल, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे, नगरसेविका उज्वला ढोरे, दिप्ती कांबळे, वर्षा जगताप, माजी नगरसेविका सीमा सावळे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, शहर उपाध्यक्ष दत्तात्रय जगताप, अभिजीत आल्हाट, शेरबहादुर खत्री, शक्रुल्ला पठाण, अकबर मुल्ला, संपतराव पाचुंदकर, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, भाग्यश्री मस्के, बाबासाहेब चौधरी, सरचिटणीस सुरेंद्रसिंग बाला, सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटी, कोमल कवडे, सरचिटणीस बापू सोनवणे, सामाजिक न्याय कार्याध्यक्ष कुमार कांबळे, धनाजी तांबे, सुनील अडागळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!