spot_img
spot_img
spot_img

प्रभाग 27 मधील पाणीपुरवठा सुरळीत करा ; नगरसेवक सागर कोकणे यांची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 27 मधील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नखाते नगर, गजानन नगर, श्रीनगर, नखाते वस्ती या भागामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असून, वारंवार नागरिकांचे तक्रारी येत आहेत. या सर्व समस्यांचे निराकरण करण्याकरिता या प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक सागर खंडू शेठ कोकणे यांनी ग प्रभाग अधिकारी यांना केली आहे.

सागर कोकणे यांनी निवेदन देत मागणी केली असून, या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 27 मध्ये गेला काही दिवसांपासून या परिसरातील पाणीपुरवठा कमी दाबाने केला जात आहे यामुळे अनेक नागरिकांच्या तक्रारी येत असून, नागरिकांच्या समस्या लक्षात घेता या प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल किंवा हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देखील निवेदनाद्वारे सागर कोकणे यांनी दिला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!