पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
मावळ : तळेगाव एमआयडीसी परिसरातील नवलाख उंब्रे येथे बसच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
हा अपघात ३ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता नॉर्मा कंपनीजवळील तळेगाव एमआयडीसी रोडवर घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पेंद्र कुमार रामसेवक व्यास (वय ४१) हे मोटारसायकल (MH 14 MX 5710) वरून नॉर्मा चौकात रस्ता ओलांडत असताना फोर्स कंपनीची बस (MH 14 CW 1260) चालकाने वेगाने व निष्काळजीपणे चालवत समोरून धडक दिली.
या अपघातात पुष्पेंद्र व्यास यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर बस चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६८/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.



