शबनम न्यूज | पुणे
पुणे जिल्हा मुस्लिम शिकलगार समाज सेवा संघाकडून काश्मीरमधील पहलगाम येथील अलीकडील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी
‘मुस्लिम शिकलगार समाज नेहमीच देशाशी आणि महाराष्ट्र राज्याशी एकनिष्ठ राहिला आहे. या क्रूर कृत्यामुळे अनेक निरपराध नागरिक आणि आपले शूर बंधू शहीद झाले असून, या घटनेमुळे आम्हाला तीव्र दुख: आणि संताप झाला आहे.
आम्ही या हल्ल्यात शहीद झालेल्या बंधूंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति गहिर्या संवेदना व्यक्त करतो. या दु:खदायी प्रसंगी आम्ही शहिदांच्या कुटुंबीयांच्या आणि जखमींच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत!’ अशी भावना व्यक्त करण्यात आली.
या दुःखद प्रसंगी, सर्व उपस्थितांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दोन मिनिटांचे मौन पाळले.
आम्ही सरकार आणि प्रशासनाला विनंती करतो की, या हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींना कठोरातिकठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीदेखील करण्यात आली.
या प्रसंगी पुणे जिल्हा मुस्लिम शिकलगार समाज संघाचे अध्यक्ष सलिम शिकलगार, नझीरभाई, दाऊदभाई आसिफभाई, जमीरभाई, हलीमा आप्पा, नसीम आप्पा, रिनाज आप्पा आणि संघटनेचे इतर सदस्य उपस्थित होते.