शबनम न्यूज | प्रतिनिधी
दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्ष तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित “दुर्गाशक्ती सन्मान सोहळा २०२६” हा कार्यक्रम ऑटो क्लस्टर ऑडिओटोरियम येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. जया उदय सामंत होत्या.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उमा खापरे, डॉ. रोहिणी सोमनाथ पाटील, डॉ. वर्षा सुपे, डॉ. मृदुला दाढे, अर्चना शर्मा कोठारी तसेच विनायक भावे यांची उपस्थिती लाभली.
यावर्षीचा दुर्गाशक्ती पुरस्कार २०२६ जयाताई उदय सामंत, डॉ. रोहिणी पाटील, डॉ. मृदुला दाढे, उद्योजिका मानसी घारे, सोनाली निघोजकर आणि सुविधा कडलग यांना प्रदान करण्यात आला. शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक महिलांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हा सन्मान इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर आणि विनायक भावे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी दुर्गा अभय भोर (राष्ट्रीय अध्यक्षा, दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्ष) यांचा देखील प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या महिलांना पैठणीसह आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्यास महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. महिला शक्तीचा उत्साहपूर्ण आविष्कार यावेळी पाहायला मिळाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत दुर्गा अभय भोर यांनी केले. भविष्यात दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्ष च्या राज्यभर शाखा स्थापन करून महिलांच्या सुरक्षा, औद्योगिक रोजगार आणि सक्षमीकरणासाठी विविध प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



