spot_img
spot_img
spot_img

चिंचवडमध्ये गावठी दारूसह एकावर कारवाई

प्रतिनिधी | युनूस खतीब

चिंचवड परिसरात गावठी हातभट्टीची दारू बेकायदेशीररित्या विक्री करताना पोलिसांनी एका व्यक्तीवर कारवाई केली.

ही कारवाई ८ मार्च रोजी रात्री बिजलीनगर झोपडपट्टीसमोर, नलावडे वस्ती येथे करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू रामरतन शाहू (वय ४६, रा. नलावडे वस्ती, बिजलीनगर चिंचवड) याच्या ताब्यात सुमारे ५ हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू विनापरवाना बाळगून विक्री करताना आढळून आली.

या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस बीएनएसएस ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे. पुढील तपास सपोफौ कुंभार करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!