spot_img
spot_img
spot_img

सोमाटणे टोलनाक्याजवळ मंगळसूत्र हिसकावणारा आरोपी अटकेत

प्रतिनिधी | युनूस खतीब

सोमाटणे टोलनाक्याजवळून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळालेल्या आरोपीस तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मार्च रोजी पहाटे सुमारे २.५० वाजण्याच्या सुमारास सोमाटणे गाव हद्दीत महाराष्ट्र हॉटेलसमोर टोलनाक्याजवळ ही घटना घडली.

फिर्यादी महिला त्यांच्या पतीसोबत सुझुकी कॅरी टेम्पोमधून काळेवाडी येथे जात असताना आरोपी आसिफ सलीम (वय ३९, रा. लेक रेसिडेन्सी, तळेगाव दाभाडे) हा त्यांच्या वाहनाजवळ आला. त्याने महिलेच्या गळ्यातील सुमारे १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचा मुलामा दिलेले मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले.

या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०९(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहारे करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!