spot_img
spot_img
spot_img

कुस्तीच्या आखाड्यात किरकोळ वादातून हाणामारी

शबनम न्यूज | पुणे

गावातील वार्षिक उत्सवात कुस्तीच्या आखाड्याचे आयोजन करण्यात येत असून, हवेली तालुक्यातील बुर्के गावात आखड्यात बसण्याच्या वादातून चौघांना काठी, दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी सातजणांविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी शंकर ठोंबरे (वय ३८), सुनील ठोंबरे (वय ४०), सुनील जांभळकर (वय ४२), संतोष जांभळकर (वय ३७), सागर जांभळकर (वय २७), विशाल जांभळकर (वय २९), गणेश जांभळकर (वय ३५, सर्व रा. बुर्केगाव, नगर रस्ता, ता. हवेली, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष महादू पवळे (वय ४९, रा. बुर्केगाव) यांनी लाेणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुर्के गावातील यात्रेत मंगळवारी सायंकाळी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी आखाड्याजवळ कुस्ती पाहण्यासाठी काहीजण बसले होते. त्या वेळी आखाड्याजवळ बसण्याच्या वादातून अभिजित बाजारे आणि शंकर ठोंबरे यांच्यात वाद झाला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!