spot_img
spot_img
spot_img

पुणे महापालिकेसाठी भाजपकडून सात स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सात जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. याबाबत पक्षाकडून अधिकृत पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे.

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पुणे महानगरपालिकेतील गटनेते गणेश मधुकर बिडकर यांना पत्र पाठवून ही नावे कळविली आहेत.

या पत्रानुसार स्वीकृत नगरसेवक पदासाठी निलेश कोंढाळकर, प्रियंका शेंडगे, विश्वास ननावरे, राजेंद्र काकडे, रवि साळेगावकर, जयप्रकाश पुरोहित आणि उदय लेले यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.

पक्षाने पाठविलेल्या पत्रात गटनेते गणेश बिडकर यांनी आपल्या स्तरावरून आवश्यक ती पुढील कार्यवाही करावी, असे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा झाल्याने पुणे महानगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!