spot_img
spot_img
spot_img

महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात

नगरसेवक सागर कोकणे यांच्या हस्ते शुभारंभ; महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या उद्देशाने सागर कोकणे युवा मंच व मेडिसर्ज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक सागर कोकणे यांच्या हस्ते करण्यात आले.

या आरोग्य शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसह परिसरातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. यात रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी तसेच जनरल हेल्थ चेकअप अशा विविध तपासण्यांचा समावेश आहे. नागरिकांना त्वरित आरोग्य मार्गदर्शनही करण्यात येत आहे.

याशिवाय सर्वसामान्य शस्त्रक्रियांवर ३० ते ५० टक्क्यांपर्यंत विशेष सवलत देण्यात आली असून या शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्णांच्या आवश्यक शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहेत.

या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून महिलांनी विशेष उत्साहाने आरोग्य तपासणी करून घेतली. समाजाच्या आरोग्यदायी भविष्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत नगरसेवक सागर कोकणे यांनी व्यक्त केले. तसेच या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानले.

महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने आणि सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!