शबनम न्यूज | प्रतिनिधी
८ मार्च जागतिक महिला दिन निमित्ताने रेम्बो सर्कसमधील सर्व महिला कलाकार व कर्मचाऱ्यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. महिलांच्या योगदानाचा गौरव करत रेम्बो सर्कसमध्ये उत्साहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
मानव सभ्यतेची कथा स्त्रीशिवाय अपूर्ण आहे, त्याचप्रमाणे रेम्बो सर्कसही महिलांशिवाय अपूर्ण आहे. रेम्बो सर्कसमध्ये महिलांनी आपले हक्क, सन्मान आणि समानतेसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. तसेच त्यांनी आपल्या कलाकारीच्या आधारे मनोरंजन करित आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या विशेष दिवशी सर्कसमधील सर्व महिलांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
रोमांचक, रंगतदार आणि नेत्रदीपक थेट मनोरंजनाची परंपरा जपणारा Rambo Circus पुणेकरांच्या आग्रहास्तव पुणे–सोलापूर महामार्गावरील शेवळेवाडी येथे धोने फोर्ड शोरूमजवळील ट्रॅव्हल पार्किंग मैदानात भव्य स्वरूपात सुरू आहे.
संपूर्ण कुटुंबासाठी सादर करण्यात आलेल्या या सर्कस शोमध्ये रोमांच, विनोद आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा संगम पाहायला मिळतो. आकाशात झेपावणारे एरियल अॅक्ट्स, कुशल जिम्नॅस्टिक सादरीकरण, हुला हूप आणि फूट जुगलिंगसारखे थरारक प्रयोग, आकर्षक लेझर लाईट शो तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हसवणारे विदूषक हे सर्कसचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत.
याशिवाय रोबोटिक हत्ती, भव्य वेशभूषेतील जिराफ आणि विविध आश्चर्यचकित करणाऱ्या सादरीकरणांमुळे प्रेक्षकांना वेगळाच अनुभव मिळत आहे. सुरक्षितता, सर्जनशीलता आणि थेट कलांना प्राधान्य देत पारंपरिक सर्कस आधुनिक रूपात सादर करण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात आला आहे.



