पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
पिंपरी : पिंपरी परिसरात सार्वजनिक रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना वेश्याव्यवसायासाठी आमिष दाखवल्याप्रकरणी एका महिलेवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.१० वाजण्याच्या सुमारास आंबेडकर पुतळा चौक ते शगुण चौक जाणाऱ्या रस्त्यावर केएसबी कंपनीच्या गेटजवळ ही घटना घडली.
संबंधित महिलेने वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना शब्द उच्चारून, डोळ्यांनी खुणा करून तसेच हाताने लैंगिक हावभाव करून ग्राहकांना बोलावण्याचा प्रयत्न केला.
यामुळे सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्यांना अडथळा निर्माण होऊन सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेला बीएनएसएस कलम ३५(३) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वारे करीत आहेत.



