पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
चिंचवड : चिंचवड परिसरात प्रसिद्ध कंपनीच्या ‘हार्पिक’ या प्रोडक्टचा बनावट माल साठवून विक्रीसाठी ठेवणाऱ्या दोघांविरुद्ध चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत सुमारे १ लाख ३४ हजार ४२० रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ मार्च २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास वाल्हेकरवाडी रोडवरील कृष्णा हॉटेलजवळील एम.के. इंटरप्रायजेस तसेच स्वामी विवेकानंद सोसायटी मागील चौधरी मार्केटिंग गोडाऊन येथे ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी हिराराम गिरीधारीलाल चौधरी (वय ४२, रा. चिंचवडेनगर) आणि विष्णुकुमार खंगाराम चौधरी (वय ३३, रा. स्वामी विवेकानंद सोसायटी, चिंचवड) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांनी गजेंद्र शेरसिंग जव्हेरी (रा. संगमनेर, अहिल्यानगर) याच्याकडून Reckitt Benckiser India Private Limited कंपनीच्या ‘Harpic’ या उत्पादनाचा बनावट माल खरेदी करून विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणी दोघांना नोटीस देण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुधे करीत आहेत.



