पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
देहूरोड : देहुगाव परिसरात पीएमपीएल बसने दुचाकीला धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास भैरवनाथ चौक ते काळुखे चौक जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली.
त्रिंबक विश्वनाथ विभुते (वय ६९, रा. पाटील नगर, चिखली) हे त्यांच्या ताब्यातील होंडा ड्युओ दुचाकी (MH 12 EX 9527) वर पत्नी भागीरथी त्रिंबक विभुते यांना घेऊन देहुगावहून चिखलीकडे जात होते.
त्यावेळी पीएमपीएल बस (MH14/HU/5037) चालक अण्णासाहेब महादेव गवते (वय ४३, रा. धर्मराज नगर, चिखली) याने भरधाव व निष्काळजीपणे बस चालवत दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात भागीरथी विभुते यांच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत होऊन डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातात दुचाकीचेही किरकोळ नुकसान झाले आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. तसेच मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निंबाळे करीत आहेत.



