spot_img
spot_img
spot_img

कुरुळीत किरकोळ वादातून मारहाण; दोघांना अटक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब

खेड तालुक्यातील कुरुळी येथील गायकवाड वस्तीमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली.

याप्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामरतन नन्हयीप्रसाद साकेत (वय ३६, रा. गायकवाड वस्ती, कुरुळी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रभातसिंग राजपूत, सुमेर राजू सिंग आणि परबत राजू सिंग यांच्याविरुद्ध बीएनएस कलम ११८(१), ११८(२), ११५(१), ३५१(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील सुमेर सिंग आणि परबत सिंग यांना पोलिसांनी अटक केली आहे.

दि. ४ मार्च रोजी दुपारी सुमारे ४.१५ वाजता फिर्यादी घरी झोपलेले असताना चिखलात ढकलल्याच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली.

यात फिर्यादीच्या हात, पाय व खांद्याला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या कमलभान साकेत यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास दक्षिण महाळुंगे पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!