पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
ताथवडे : वॉचमनला शिवीगाळ का करता? असा जाब विचारल्याच्या कारणावरून दोन तरुणांनी हॉटेल व्यावसायिक व त्याच्या सहकाऱ्यावर मारहाण केल्याची घटना ताथवडे येथील आयव्ही लीग हॉस्टेलजवळ घडली.
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विराज दत्तात्रय खुटवड (वय २८, रा. पिंपळे सौदागर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी उत्कर्ष शुक्ला (रा. थेरगाव) आणि राघव योगेंद्र श्रीवास्तव (वय २०, रा. आयव्ही लीग हॉस्टेल, ताथवडे) यांच्याविरुद्ध बीएनएस कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३/५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास शिवार हॉटेल मागील आयव्ही लीग हॉस्टेल गेट क्रमांक २ समोर ही घटना घडली.
वॉचमनला शिवीगाळ का करता असा जाब विचारल्यावर आरोपींनी संगनमत करून फिर्यादी व हॉटेलचा कॅशिअर आनंद घोरबांड (वय २२) यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली.
यावेळी उत्कर्ष शुक्ला याने हातातील धातूचे कडे काढून फिर्यादीच्या डोक्यात मारल्याने ते जखमी झाले.
या प्रकरणी राघव श्रीवास्तव याला नोटीस देऊन मुक्त करण्यात आले असून पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.



