शबनम न्यूज | प्रतिनिधी
रूपीनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयासंदर्भातील प्रलंबित प्रश्नावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयात गुरुवारी (दि.५) सकारात्मक चर्चा झाली.
ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी महापौर कार्यालयात भेटीस आले असता त्यांनी संघाच्या कार्यालयासंदर्भातील अडचणी व प्रलंबित प्रश्न मांडला.
या मागणीची तात्काळ दखल घेत संबंधित विषय मार्गी लावण्यात आला.
रूपीनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येण्यासाठी तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यासाठी स्वतंत्र आणि योग्य जागा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात असल्याने त्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी महापौर कार्यालयाकडून ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले.
या भेटीदरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपायुक्त ममता शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव तसेच रूपीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



