spot_img
spot_img
spot_img

नागरिकांच्या तक्रारीची तात्काळ दखल ; सागर कोकणे यांनी दिले तातडीचे आदेश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 27 मधील मधुबन कॉलनी, तापकीर मळा परिसरातील नागरिकांच्या ड्रेनेज समस्येची तात्काळ दखल घेत नवीन ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सागर कोकणे यांनी प्रशासनाला निर्देश दिले.

मधुबन कॉलनी आणि तापकीर मळा येथील नागरिकांनी जुन्या व जीर्ण ड्रेनेज लाईनमुळे खराब पाण्याची गळती होत असल्याची तक्रार केली होती. या गळतीमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीनेही त्रास सहन करावा लागत होता.

नागरिकांनी मांडलेल्या या समस्येची दखल घेत नगरसेवक सागर कोकणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जुनी ड्रेनेज लाईन काढून त्या ठिकाणी नवीन ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. या कामामुळे परिसरातील दूषित पाण्याची गळती थांबून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी सागर कोकणे यांनी सांगितले की, “परिसर स्वच्छ, निरोगी आणि सुरक्षित राहावा हा आमचा प्राधान्यक्रम आहे. प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नगरसेवक म्हणून मी सदैव कटिबद्ध आहे. नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत परिसरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे.”

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!