spot_img
spot_img
spot_img

भंडारा डोंगर परिसरात पत्नीवर जीवघेणा हल्ला; पती अटकेत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मावळ तालुक्यातील भंडारा डोंगर परिसरात पत्नीवर दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

ही घटना बुधवारी (दि. ४ मार्च) पहाटे साडेचारच्या सुमारास सुदवडी (ता. मावळ, जि. पुणे) येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती राममणी कुशवाहा (वय २२, सध्या रा. म्हाळुंगे कमानीजवळ, ता. खेड, जि. पुणे) या आपल्या पतीसोबत भंडारा डोंगरावरून खाली येत असताना दोघांमध्ये वाद झाला.

आरोपी पतीचे त्याच्या नात्यातील खुशबू नावाच्या महिलेबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून हा वाद झाला असल्याचे सांगितले जाते.

वादाच्या वेळी आरोपीने फिर्यादीस “मला तुझ्यासोबत राहायचे नाही, तू इथून निघून जा” असे सांगितले. त्यानंतर संतापाच्या भरात आरोपीने फिर्यादीला ढकलून खाली पाडले व तिच्या अंगावर बसून बाजूला पडलेला दगड उचलून तिच्या उजव्या गालावर, उजव्या डोळ्याखाली तसेच डोक्यावर तीन ते चार वेळा मारहाण केली.

या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाली आहे.

या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६४/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११८(१), ११८(२), ११५(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेळेकर करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!