spot_img
spot_img
spot_img

अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्यावर भर देण्यात येणार – अभिषेक बारणे

स्थायी समितीच्या पहिल्या बैठकीत फक्त साडेसात लाख रुपयांच्या खर्चास मान्यता

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये ‘इन्कम जनरेशन’ आणि ‘प्रदूषण नियंत्रण’ या दोन प्रमुख सूत्रांवर भर देत शहराच्या शाश्वत विकासाचा आराखडा राबविण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिली.

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या स्थायी समिती बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बैठकीत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी सुमारे ७.५० लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

शहरातील वाढत्या धुळीच्या पार्श्वभूमीवर बांधकाम ठिकाणांची सुरक्षा तपासण्यासाठी दोन विशेष पथके नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच क्षेत्रीय कार्यालयांनी मोठ्या प्रकल्पांची नियमित देखरेख करावी, असे निर्देश देण्यात आले.

महापालिकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी करसंकलन वाढविणे, होर्डिंग्जद्वारे महसूल वाढविणे आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्यावर भर देण्यात येणार आहे. पालिकेवरील कर्ज कमी करून कर्जमुक्तीकडे वाटचाल करण्याचा संकल्पही सभापतींनी व्यक्त केला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!