spot_img
spot_img
spot_img

जुनी सांगवीत मध्यरात्री धारदार शस्त्राने हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब

पुणे : जुनी सांगवी येथील ममता नगर परिसरात मध्यरात्री तिघांनी तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला करून दहशत माजविल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२ मार्च रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गणपती मंदिराजवळ ममता नगर लेन नं. २ येथे फिर्यादी रोहित कांबळे व त्यांचे मित्र गप्पा मारत असताना, आरोपी दुचाकीवरून आले.

ओळख विचारण्याच्या कारणावरून शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत आरोपींनी सोबत आणलेल्या सुऱ्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले.

यानंतर आरोपींनी परिसरात आरडाओरड करत दहशत निर्माण केली.

या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, आरोपी अक्षय उर्फ जोग्या जाधव, अक्षय उर्फ बब्या जावळे व अर्जुन देवकांबळे (सर्व रा. जुनी सांगवी) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आरोपी अद्याप फरार असून पुढील तपास Pimpri Chinchwad Police करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!