spot_img
spot_img
spot_img

ऑनलाईन शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने १५.३५ लाखांची फसवणूक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब

पिंपरी : ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका पुरुषाची १५ लाख ३५ हजार ११७ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान फिर्यादी यांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील करून शेअर्स व आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले.

‘कॅपस्टोन’ नावाच्या ॲपवर खात्यात ५५ लाख रुपये शिल्लक असल्याचे दाखवण्यात आले. मात्र रक्कम काढण्यासाठी कर भरण्याच्या नावाखाली आणखी पैसे घेतल्यानंतर आरोपींनी संपर्क तोडला. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

या प्रकरणाचा तपास Pimpri Chinchwad Police करीत असून आरोपी अद्याप फरार आहेत. नागरिकांनी ऑनलाईन गुंतवणुकीबाबत सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!