spot_img
spot_img
spot_img

भुगांव येथील हॉटेलवर हुक्का कारवाई, दोघांविरोधात गुन्हा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब

पुणे : भुगांव (ता. मुळशी) येथील ‘डस्क अॅण्ड डाऊन’ हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने हुक्का सेवा सुरू असल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२ मार्च रोजी मध्यरात्री पाच मिनिटांनी पोलिसांनी छापा टाकला असता, हॉटेलमध्ये हुक्क्यासाठी स्वतंत्र झोन न करता ग्राहकांची गर्दी करून तंबाखुजन्य व ज्वालाग्राही पदार्थांचा वापर केला जात असल्याचे आढळून आले.

यावेळी हुक्का पॉट व फ्लेवर असा सुमारे २,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आकाश सोनार (रा. कोथरुड) व सोहराब सलीम खान (रा. भुगांव) यांच्यावर भारतीय न्याय संहिता व सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

पुढील तपास Pimpri Chinchwad Police करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!