spot_img
spot_img
spot_img

चिखलीत प्रतिबंधित गुटख्याची विक्री, एकाला अटक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब

पिंपरी : शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, सुगंधीत तंबाखू व पानमसाल्याची अवैध विक्री केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई आकुर्डी–चिखली रोडवरील फुलेनगर, कृष्णानगर परिसरातील सिद्धेश्वर पान शॉपमध्ये करण्यात आली.

२ मार्च रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता, आरोपी प्रताप जयद्रय शिंदे (वय २१, रा. चिखली) याच्याकडे शासनाने प्रतिबंधित केलेला सुमारे ४,४०० रुपयांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांचा साठा विक्रीसाठी आढळून आला.

अन्नसुरक्षा आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करून हा साठा बाळगण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास Pimpri Chinchwad Police करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!