पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
पिंपरी : चिखली परिसरात विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हिबिशन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२ मार्च रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास साई विश्व हॉस्पिटलसमोर, भिमशक्तीनगर, मोरेवस्ती येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकण्यात आला.
यावेळी आरोपी गौरव केशव गायकवाड (वय ३३, रा. मोरेवस्ती, चिखली) याच्याकडे विनापरवाना विक्रीसाठी ठेवलेली सुमारे ३० लिटर गावठी दारू (किंमत अंदाजे ३,००० रुपये) तसेच विक्रीतून मिळालेले ३७० रुपये रोख रक्कम असा एकूण ३,३७० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
या कारवाईत आरोपीस नोटीस देण्यात आली असून पुढील तपास Pimpri Chinchwad Police करीत आहेत.


