पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
पिंपरी : तळेगाव दाभाडे परिसरात पोलिसांनी कारवाई करत एमडी (मॅफेड्रॉन) अंमली पदार्थासह दोघांना अटक केली आहे.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास एम.एस.सी.बी. तळे परिसरातील कच्च्या रस्त्यावर छापा टाकण्यात आला.
यावेळी आरोपी इलाही अकबर शेख (रा. थेरगाव) व रफिक करीम मुजावर (रा. चिंचवड) यांच्या ताब्यातून सुमारे ७ लाख १२ हजार रुपये किंमतीचा ११ ग्रॅम २१ मिलीग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी) व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
आरोपी अनधिकृतपणे विक्रीसाठी अंमली पदार्थ बाळगत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणाचा पुढील तपास Pimpri Chinchwad Police करीत आहेत.


