spot_img
spot_img
spot_img

चाकणमध्ये गांजासह तरुणावर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब

पुणे : चाकण परिसरात पोलिसांनी कारवाई करत गांजा बाळगणाऱ्या तरुणावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.

२ मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास चाकण मार्केट यार्डच्या पाठीमागील भिंतीजवळ, कांडगे वस्ती परिसरात छापा टाकण्यात आला.

यावेळी आरोपी रमन कुमार तपेंद्र मंडल (वय २२, रा. चाकण) याच्याकडे विक्रीसाठी बाळगलेला सुमारे २५,१०० रुपये किंमतीचा ५५० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. आरोपीकडे कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास Pimpri Chinchwad Police करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!