spot_img
spot_img
spot_img

चाकणमध्ये कौटुंबिक वादातून महिलेवर व मुलीवर हल्ला, चौघांविरोधात गुन्हा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चाकण परिसरात जमिनीच्या पैशांच्या वादातून एका महिलेवर काचेची बाटली व लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१ मार्च रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास आगरकरवाडी रोडवरील साईदत्त कॉलनी येथे ही घटना घडली.

फिर्यादी अविता कुयहाडे यांच्या पतीने जमिनीच्या व्यवहारासाठी सही करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांच्या घरासमोर येऊन वाद घातला.

यावेळी दोन आरोपींनी काचेच्या बाटलीने डोक्यावर मारून जखमी केले, तर अन्य आरोपींनी लाकडी दांडक्याने हात व पाठीवर मारहाण केली.

या घटनेत फिर्यादींच्या आठ वर्षांच्या मुलीलाही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास Pimpri Chinchwad Police करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!