पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
पुणे : खेड तालुक्यातील काळुस गावच्या हद्दीत भीमा नदीकाठावर गावठी हातभट्टी दारू निर्मितीसाठी साठवलेले मोठ्या प्रमाणातील रसायन पोलिसांनी जप्त केले आहे.
या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता, शेतातील लोखंडी ड्रम व खड्ड्यांमध्ये दारू तयार करण्यासाठी भिजत घातलेले सुमारे १६ हजार लिटर गूळ-मिश्रित रसायन आढळून आले.
या साठ्याची अंदाजे किंमत लाखो रुपयांची असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी घटनास्थळावरून पळून गेले असून अद्याप अटक झालेली नाही.
या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर दारू निर्मितीला मोठा आळा बसला असून पुढील तपास पिंपरी चिंचवड पोलीस करीत आहेत.


