पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी : युनूस खतीब
संत तुकारामनगरमध्ये कुत्र्यांवर अमानुष अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात कुत्र्यांवर अमानुषपणे अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवनाजवळ २८ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा एकाच्या सुमारास काही तरुणांनी कुत्र्यांना मारहाण करत एका कुत्र्याला हवेत गोल फिरवून जमिनीवर आपटल्याने तो गंभीर जखमी झाला.
तसेच आरोपी व त्यांच्यासोबत असलेल्या ७ ते ८ जणांनी आरडाओरड करत चारचाकी वाहनातून रस्त्याकडील कुत्र्यांना उडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी वकील प्रज्वल दुबे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात स्वप्नील सावंत व अन्य चार इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२५ तसेच प्राण्यांना कुरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सुरू असून आरोपी अद्याप अटक केलेली नाही.


