spot_img
spot_img
spot_img

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महिंद्रा लॉजिस्टिक लि. आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यातील तिसरा वेतनवाढ करार संपन्न झाला असून, हा लॉजिस्टिक उद्योगातील इतिहासातील सर्वात मोठा विक्रमी करार ठरला आहे. हा करार  चाकण औद्योगिक वसाहतीत निघोजे येथील कंपनीच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात औपचारिक केला गेला.या करारानंतर कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.

करार सोहळ्यात संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे, रोहिदास गाडे, अध्यक्ष जीवन येळवंडे, तसेच कंपनीकडून असोसिएट व्हा. प्रेसिडेंट एच. आर. संजय गावडे आणि असिस्टंट व्हा. प्रेसिडेंट एच. आर. प्रदीप झोटिंग प्रमुख उपस्थित होते.

करारातील प्रमुख सुविधा पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये एकूण पगारवाढ: ₹15,500/- (CTC मध्ये), रेशो ३०%, ३०%, ४०%, विभागणी २५% DA बेसिक, ७५% इतर अलाऊन्स. कराराचा कालावधी: ०१/०३/२०२६ ते ३१/०८/२०२९ (साडेतीन वर्षे). रजा सुधारणा: ३६६ कामगारांच्या रजेत ३ दिवसांची वाढ, सर्वांसाठी समान रजा. पगाराची उचल: ग्रॉस पगाराच्या तीनपट वैद्यकीय कारणांसाठी मंजूर. ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी: ₹5 लाख. ग्रुप टर्म इन्शुरन्स पॉलिसी: ₹5 लाख. करार वेळेत पूर्ण होण्याबद्दल बक्षीस: ₹7,500/- सर्व कामगारांना. बोनस: मागील आर्थिक वर्ष २४–२५: ₹39,200/-, २०२६–२९ दरम्यान वाढीव रक्कम: ₹43,800 ते ₹59,100/-उत्पादन वाढ: पहिल्या तीन वर्षांत दर वर्षी ७%, पुढील सहा महिन्यांसाठी ३.५% असा आहे.

करारावर सह्या करताना संघटनेच्या वतीने  आमदार महेश लांडगे, संघटनेचे मार्गदर्शक रोहिदास गाडे, अध्यक्ष जीवनशेठ येळवंडे आणि व्यवस्थापनाकडून संजय गावडे, प्रदीप झोटिंग, धीरज सिंह, निंबा भांबरे, नामदेव टाचतोडे, राहुल भागवत यांचा समावेश होता. कार्यक्रमात सर्व उपस्थित कामगारांना मार्गदर्शन मिळाले आणि आनंद साजरा करण्यासाठी पेढे वाटणे आणि फटाके फोडण्याचा सोहळा पार पडला. संघटनेच्या नेतृत्वाखाली आणि व्यवस्थापनाच्या सहकार्याने संपन्न झालेला हा करार कामगारांच्या हक्कांचा मजबूत दाखला असून, लॉजिस्टिक क्षेत्रातील मानवी विकासाला नवीन दिशा देणारा ठरला आहे.

“महिंद्रा लॉजिस्टिकमधील कामगार हे फक्त आमच्या कंपनीचे आधारस्तंभ नाहीत, तर ते उद्योगाचा आत्मा आहेत. या कराराद्वारे आम्ही फक्त पगारवाढ देत नाही, तर कामगारांच्या जीवनमानात खऱ्या अर्थाने सुधारणा घडवून आणत आहोत. रजा, बोनस, आरोग्य सुरक्षा आणि उत्पादन वृद्धी यासारख्या सर्व बाबींचा विचार करून हा करार करण्यात आला आहे. आम्ही विश्वास ठेवतो की कामगार जेवढे सुरक्षित, संतुष्ट आणि प्रोत्साहित असतील, तितकेच कंपनीचे यश अधिक दृढ होईल. आमचा उद्देश आहे की प्रत्येक कामगाराला न्याय मिळावा, त्यांना त्यांच्या मेहनत आणि योगदानाची खरी कदर होईल, आणि हा करार त्याच दृष्टीने इतिहासात एक ठळक उदाहरण बनेल.”
— महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!