spot_img
spot_img
spot_img

बंद खात्याचा चेक देऊन ६.७९ लाखांची फसवणूक ; मोशीतील ज्वेलर्स दुकानात प्रकार

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात १२०/२०२६ असा गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) अन्वये दाखल करण्यात आला आहे.

दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास मोशी येथील बो-हाडेवाडी परिसरातील न्यू गणेश ज्वेलर्स या दुकानात ही घटना घडली.

आरोपी गुलाब सिंग गेनसिंग चौहान (वय २४, रा. इंद्रायणी गार्डन अपार्टमेंट, इंद्रायणीनगर, भोसरी) याने फिर्यादीच्या दुकानात येऊन ६ लाख ७९ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, लॉकेट व कडे खरेदी केली.

आरोपीने दागिन्यांची रक्कम अदा करण्यासाठी IDFC फर्स्ट बँकेचा ६,७९,००० रुपयांचा चेक दिला. तसेच आपला वाढदिवस असल्याचे सांगत फिर्यादीचा विश्वास संपादन करून दागिने घेऊन दुकानातून निघून गेला.

मात्र नंतर संबंधित चेक बँकेत सादर केल्यानंतर आरोपीचे खाते बंद असल्याने तो चेक नापास झाला.

यामुळे आरोपीने बंद खात्याचा चेक देऊन आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी फिर्यादी सतिश ज्ञानदेव वालसिंगे (वय अंदाजे ४५, रा. जय गणेश साम्राज्य चौक, भोसरी गाव) यांनी तक्रार दाखल केली आहे.

सदर गुन्ह्यात अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पानसरे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!