पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
आळंदी पोलीस स्टेशन येथे ८८/२०२६ असा गुन्हा मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ (फ) अन्वये दाखल करण्यात आला आहे.
दिनांक १ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.१० वाजताच्या सुमारास मौजे मरकळ, ता. खेड, जि. पुणे येथील पाटील वस्ती परिसरात ही कारवाई करण्यात आली.
पोलीस शिपाई हरीराम तुळशीराम डुमनर (ब. नं. २६३६) यांनी मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला असता आरोपी सुरज कुमार (रा. मरकळ, ता. खेड, जि. पुणे) हा बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे एकूण २ लाख ६ हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन जवळ बाळगत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने परिसरातील झाडाझुडपांचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
या प्रकरणाचा पुढील तपास मोटार पोलीस नाईक गाडवे करीत आहेत. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.


