spot_img
spot_img
spot_img

आळंदीत विवाहितेवर पतीकडून मारहाण ; सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब

आळंदी पोलीस स्टेशन येथे ८७/२०२६ असा गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ३५१(२), ३५२, ३(५) तसेच भादंवि कलम ३२६, ५०६, ५०४, ३४ अन्वये दाखल करण्यात आला आहे.

दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ठाकरवस्ती, श्रीमान पार्क, वडगाव रोड, आळंदी (ता. खेड, जि. पुणे) येथील फिर्यादीच्या राहत्या घरी हा प्रकार घडला.

फिर्यादीच्या आई भेटीस आल्याचा राग मनात धरून पती अभिषेक भिमराव भोरे (वय २३) याने फिर्यादीला लाकडी दांडक्याने पाठीवर व हातावर मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यावेळी महिला आरोपी व सासरे भिमराव भोरे (वय ५०) यांनीही शिवीगाळ करत दमदाटी केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी महिला फिर्यादीने तक्रार दाखल केली असून तिन्ही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार सोनवणे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!