spot_img
spot_img
spot_img

तडीपार असतानाही कोयता बाळगणारा तरुण आढळला ; एमआयडीसी भोसरीत गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे येथे ११८/२०२६ असा गुन्हा भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२, ३७(१), ३७(३) सह १३५ अन्वये दाखल करण्यात आला आहे.

दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.१० वाजताच्या सुमारास सहारा स्वीट चौक ते विश्वेश्वर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला, माने कंपनीजवळ ही कारवाई करण्यात आली.

गस्तीदरम्यान आरोपी बालाजी नंदु शिंदे (वय १९, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) हा संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे आढळून आले.

तपासात आरोपीवर मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांचा कोणतेही शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश लागू असताना तसेच मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ–३ यांचे तडीपार आदेश क्र. १५३/२०२५ अन्वये दोन वर्षांसाठी तडीपार असतानाही त्याने स्वतःजवळ सुमारे २०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता बाळगल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मणेर करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!