spot_img
spot_img
spot_img

पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी चिंचवड काँग्रेसच्या वतीने निषेध

शबनम न्यूज | पिंपरी

जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील पर्यटकांवर दहशतवाद्यांनी मंगळवारी हल्ला केला. या गोळीबारात २८ पर्यटक मृत्यूमुखी पडले. या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी येथे जाहीर निषेध आणि मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय व काँग्रेस कमिटीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, पिंपरी चिंचवड महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सायली नढे, युवकाध्यक्ष कौस्तुभ नवले, ॲड. उमेश खंदारे, सौरभ शिंदे, हिरा जाधव, स्वाती शिंदे, आशा भोसले, प्रियंका सगट, प्रज्ञा जगताप, रंजना सौदेकर, जय ठोंबरे, आबा खराडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी (दि. २२) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला, ज्यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. तर पुणे जिल्ह्यातील दोन पर्यटक मृत्यूमुखी पडले आहेत. पुणे जिल्ह्यातून सुमारे ३५६ पर्यटक जम्मू आणि काश्मीर राज्यात गेले असून त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील ३० पेक्षा जास्त पर्यटकांचा समावेश आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!